सातारा : मुलानेच स्वतःच्या घरातील सुमारे सहा लाखांच्या दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हेमा विलास मोरे रा. बेबलेवाडी, पोस्ट नुने, ता. सातारा यांच्या राहत्या घरात येऊन त्यांचा मुलगा अक्षय विलास मोरे याने घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले 5 लाख 73 हजार 581 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याबाबत मुलाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवसे करीत आहेत.