सातारा : सातारा शहरातील दोन जुगार अड्ड्यांवर सातारा शहर पोलिसांनी छापे टाकून चारजणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात जुगार प्रकरणी दोन अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकले. शिवराज पेट्रोलपंप परिसरात टपरीच्या आडोशाला जुगार प्रकरणी निनाद भरत सुरगुडे (वय 19, रा. मोळाचा ओढा, सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून रोख 1350 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
दुसरा गुन्हा अभिजीत अशोक चौगुले (वय 28, रा. मंगळवार पेठ, सातारा), अजय प्रभाकर मांडोळे (वय 53, रा. सदरबझार, सातारा), आकाश हणमंत पवार (रा.सैदापूर ता.सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयितांकडून रोख 700 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलिसांनी ही कारवाई सिव्हील हॉस्पिटलसमोर केली आहे.