सातारा : सॅटर्डे क्लब संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी उद्योजकांतर्फे चालवली जाणारी संस्था आहे. महाराष्ट्रीयन उद्योजकांनी उद्योग व्यवसायातून लक्ष्मीची उपासना करावी, एकमेकांना मदत करून व्यवसाय वृद्धी करावी, हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. संस्थेचे हे रौप्य वर्ष आहे आणि संस्थेचे सातार्यात जे बीज रोवले गेले त्याला सात वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन सॅटर्डे क्लब सातारा रिजन तर्फे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेत उद्योजकांची पदयात्रा आयोजित केलेली आहे. सॅटर्डे क्लब चा प्रचार आणि प्रसार संपूर्ण सातार्यात व्हावा. आणि अधिकाधिक लोकांपर्यंत क्लब ची माहिती पोहोचावी हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश असणार आहे.
पदयात्रेची सुरुवात तालीम संघ मैदानावरून होईल. तिथून पुढे कमानी हौद मार्गे मोती चौक - राजवाडा - पुन्हा मोती चौक. त्यानंतर खालच्या रस्त्या मार्गे 501 पाटी - पोलीस मुख्यालय मार्गे पुन्हा तालीम संघ असा पदयात्रेचा मार्ग राहणार आहे.
व्यावसायिकांच्या या आगळ्यावेगळ्या आणि सातार्यात प्रथमच होणार्या पदयात्रेमध्ये सातार्यातील जास्तीत जास्त व्यवसायिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट सातारा च्या वतीने रिजन हेड अजय शिंदे, डेप्युटी रिजन हेड सचिन कुंभार तसेच सातारा चॅप्टर चेअर पर्सन प्रणित कुंदप, सेक्रेटरी सुहासिनी निकम आणि पदयात्रा संयोजक विजय बाचुलकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
सातारा शहरात दि. 24 रोजी उद्योजकांच्या भव्य पदयात्रेचे आयोजन
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम
by Team Satara Today | published on : 23 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा