सातारा : राधिका रोडवरील मार्केटयार्ड परिसरात अनोळखी दुचाकी चालकाने धडक दिल्यानंतर तेथे तो न थांबता पसार झाला. या अपघातात वृध्द महिला जखमी झाल्या आहेत.
सौ.जोत्सना नंदकुमार मेणकर (वय ६०, रा. मार्केटयार्ड परिसर, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. १० नोव्हेंबर रोजी घडली आहे. संशयित अनोळखी दुचाकीस्वार ट्रिपलसीट होता, असे तक्रारीत म्हटले आहे.