लोणंद पोलिसांची दिमाखदार कारवाई

केवळ एका तासात आवळल्या खुनातील आरोपींच्या मुसक्या

by Team Satara Today | published on : 05 April 2025


सातारा : खुनाचा गुन्हा घडल्यानंतर केवळ एका तासात गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात लोणंद पोलिसांना यश आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आज दि. 5 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास इंदिरानगर, ता. खंडाळा, जि. सातारा गावच्या हद्दीत बिरोबा मंदिरात सतीश भाऊसो काळे आणि रोहित शिवाजी डेंगळे दोन्ही रा. इंदिरानगर, लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा यांनी पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून किरण किसन गोवेकर रा. कोरेगाव ता. फलटण, जि. सातारा यांस लाकडी फळकुटाने डोक्यात मारून, चाकूने भोकसून, त्यांचा खून करून हे दोघे फरार झाले होते.

संबंधितांना पकडण्याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डी वाय भालचिम यांच्या सूचनांनुसार लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घुले, सहाय्यक पोलीस फौजदार देवेंद्र पाडवी, पोलीस हवालदार चंद्रकांत काकडे, नितीन भोसले, सर्जेराव सुळ, विजय पिसाळ, धनाजी भिसे, संतोष नाळे, महेश टेकवडे, विठ्ठल काळे, सुनील नामदास, सचिन कोळेकर, सतीश दडस, केतन लाळगे, अभिजीत घनवट, शेख, शिंगाडे, राणी कुदळे, भारती मदने, स्नेहल कापसे, होमगार्ड सचिन निकम, अनिल पवार, सुहास काटकर, विकास कोकरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शास्ती कराबाबत शंकर माळवदे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
पुढील बातमी
बुरखा घालून चैन स्नॅचिंग करणारे दोन जण जेरबंद

संबंधित बातम्या