सातारा नगरपालिकेचा थकबाकीदारांना दणका; वसुलीची मोहिम तीव्र

मागील 8 दिवसांत 5 मालमत्ता सील व 7 नळ कनेक्शन कट करण्याची कारवाई

by Team Satara Today | published on : 14 February 2025


सातारा : सातारा नगरपालिकेच्या वसुली विभागाने शहरातील रामाचा गोट, मल्हार पेठ, चिमणपुरा या भागातील नगरपालिकेचा कर थकविल्याने मागील ८ दिवसांत ५ मिळकती सील केल्या. तसेच याच भागातील ७ नळ कनेक्शन कट केलेले आहेत.

मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार वसुली विभागाने शहरातील थकबाकी मालमत्ता धारकांच्या विरोधात वसुली मोहिम सुरु केलेली आहे. थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येत असल्याने, मिळकत धारक कराची रक्कम भरत आहेत. वसुली विभागाने थकबाकीदारांना जप्ती करण्यापूर्वीची नोटीस बजावली असून अनेक थकबाकीदार कर भरण्यास दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे थकबाकीदारांना वसुली विभागाने कारवाई सुरु केलेली आहे.

सील केलेल्या मालमत्तेमध्ये १० फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत रामाचा गोट येथील २, मल्हार पेठेतील २ व चिमणपुरा येथील १ अशा एकूण ५ ठिकाणी ६,६३,४६९ रुपयांची मालमत्ता सील करण्यात आली.

५ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान नळ कनेक्शनच्या कारवाईत मल्हार पेठ येथील ३, चिमणपुरा येथील ४ अशी एकूण ७ ठिकाणी ४,३४,०३५ रुपयांच्या थकबाकी प्रकरणी नळ कनेक्शन कट केले आहेत.

मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली कर अधिकारी उमेश महादर यांच्या नियंत्रणामध्ये वॉरंट अधिकारी महेश सावंत व अमित निकम, लिपीक मिलींद सहस्त्रबुद्धे, संजय कोळी, जगदीश मुळे, भारत चौधरी, उत्तम खवळे व पियुष यादव यांनी कारवाईत भाग घेतला.

 

नागरिकांच्या सोयीसाठी फेब्रुवारी महिन्यापासून सोमवार ते शनिवार यादिवशी शासकीय सुट्टी असली तरीही वसुलीचे कामकाज सुरु राहणार असून, नागरिकांनी सोमवार ते शनिवार या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांनी कर भरावा. तसेच गुगल प्ले स्टोअर वर माय सातारा ॲप डाऊनलोड करुन ऑनलाईन कर भरणा घरबसल्या करावा.
- अभिजीत बापट
मुख्याधिकारी तथा प्रशासक, सातारा नगरपालिका.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
छत्रपती शिवाजी कॉलेज व पत्रकार संघाच्या वतीने सातारा शहरात कार्यशाळा
पुढील बातमी
शिवसैनिकांनी वाचला परिवहन अधिकार्‍यांकडे तक्रारींचा पाढा

संबंधित बातम्या