फलटण : फलटण शहर तसेच तालुक्यातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरवडी, ता. फलटण येथील बसस्थानकाच्या जवळून अज्ञाताने दुचाकीची चोरी केली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सतीश विष्णू बंडगर (रा. बंडगरवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार दि. 29 ते 30 डिसेंबरदरम्यान घडला आहे.
दुसर्या घटनेत, फलटण शहरातील लक्ष्मीनगरमधून दुचाकीची चोरी करण्यात आली. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अभिजित शिवाजी भोसले (रा. कोळकी, फलटण) यांनी तक्रार दिली आहे. दि. 15 जानेवारी रोजी रात्री पावणेनऊ ते नऊच्या सुमारास अज्ञाताने दुचाकी (एमएच 11 एझेड 2850) ची चोरी केली.