सातारा : शनिवार पेठ परिसरात राहत्या घराजवळ शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली. तक्रारदार व विरोधक हे एकमेकांचे ओळखीचे असून कोणतेही कारण नसताना विरोधक हर्षद नईम शेख याने तक्रारदार उमेश भोज यास शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
ही घटना दि. १४ रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास शनिवार पेठ, सातारा येथे घडली. याप्रकरणी उमेश दिलीप भोज (वय ३२, रा. संभाजीनगर, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.
तक्रारीवरून हर्षद नईम शेख (वय ३२, रा. शनिवार पेठ, सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल या करीत आहेत.