महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

सातारा : महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उज्वला बाळू जगदाळे रा. इंदिरानगर, सातारा यांच्या घरात श्रीकांत बाळू जगदाळे उर्फ बापू रा. तामजाई नगर, सातारा याने लोखंडी रॉडने मारहाण करून उज्वला जगदाळे यांना जखमी केले. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.


मागील बातमी
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे
पुढील बातमी
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा

संबंधित बातम्या