‘आयएनटी’च्या हिंदी विभागात सातारचे लेखक राजीव मुळ्ये सर्वोत्कृष्ट लेखक; ‘माइंड युवर स्पेस’ एकांकिकेस द्वितीय क्रमांक

by Team Satara Today | published on : 12 October 2026


सातारा : मुंबई येथील इंडियन नॅशनल थिएटर अर्थात ‘आयएनटी’च्या प्रतिष्ठेच्या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतील हिंदी विभागाच्या अंतिम फेरीत सातारचे लेखक राजीव मुळ्ये यांनी लिहिलेल्या ‘माइंड युवर स्पेस’ या एकांकिकेने दुसरा क्रमांक पटकावला. या एकांकिकेला लेखनासाठीचा प्रथम पुरस्कार मिळाला असून, मोहित शेजवाळे याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला.
साठ्ये स्वायत्त महाविद्यालय, विलेपार्ले या संघाने या एकांकिकेचे सादरीकरण केले होते. याच महाविद्यालयाच्या ‘हॉन्टेड हनिमून’ या एकांकिकेने मराठी विभागातही चमकदार कामगिरी केली. या एकांकिकेतील तब्बल सात जणांनी अभिनयाचे पारितोषिक मिळवले. ही एकांकिकाही राजीव मुळ्ये यांनीच लिहिलेली आहे. हिंदी आणि मराठी दोन्ही विभागांत प्रत्येकी पाच एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या होत्या. साठ्ये महाविद्यालयाने दोन्ही विभागांत अंतिम फेरीत धडक मारली.
या दुहेरी यशाबद्दल तुषार भद्रे, बाळकृष्ण शिंदे, चंद्रकांत देवरुखकर, कल्याण राक्षे, अमित देशमुख, मकरंद गोसावी, राजेश मोरे, कुलदीप मोहिते, संदीप जंगम, दीपक देशमुख, संतोष पाटील यांच्यासह सातारच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि रंगकर्मींनी राजीव मुळ्ये यांचे अभिनंदन केले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मालखेड फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सहा वर्षांची बालिका ठार; आईसह चुलता गंभीर जखमी
पुढील बातमी
सैनिक स्कूल ग्राउंड सातारा येथे २४ ते २७ ऑक्टोबर कालावधीत माजी सैनिक, माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती रॅलीचे आयोजन

संबंधित बातम्या