सातारा : मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय शंकर पवार (वय 41, रा. माजगावकर माळ झोपडपट्टी, सातारा) यांनी सुदर्शन गायकवाड व अनोळखी त्याचा साथीदार यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 1 जून रोजी बुधवार नाका येथे घडली आहे. दगडाने मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.