सातारा : अंमली पदार्थ आणि द्रव्य माणसाला गुलाम बनवते. कुठलेही व्यसन सर्वार्थाने हतबल बनवते. व्यसनात हतबल झालेला माणूस नीतिमत्ता हरवून बसतो असे मत सामाजिक कार्यककर्ते व समुपदेशक किशोर काळोखे यांनी व्यक्त केले.
ज्ञानश्री इंजिनियरिंग कॉलेज, गजवडी आणि परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था, सातारा आयोजित केलेल्या अंमली पदार्थ व्यसन विरोधी अभियानात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी डॉ सी. एस. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. काळोखे पुढे म्हणाले. मेफड्रोनसारखे पदार्थ युवकांना दुबळे बनवत आहेत. मेंदूतील न्युरो ट्रान्समीटर वर परिणाम करते. मेफेड्रोन या कृतिम उत्तेजित पदार्थामुळे माणसाच्या मेंदूतील जैव रासायनिक असमतोल पणामुळे माणूस चिंताग्रस्त आणि उदास बनतो. हा मानसिक परिणाम संबंध कुटुंब आणि आयुष्य उध्वस्त करते. कमी वयात लागलेले व्यसन सुटण अवघड असते. एकमेकांच्या सहवासात संगत महत्वाची असते. व्यसनाला नकार देण्याची कौशल्य महत्वाची आहेत. सर्वार्थाने व्यसन घातकच असते सांगितले. तसेच मैदानी खेळ आपणाला मोबाईल पासून दूर ठेवतात. तर छंद आणि कला आपणाला निखळ आनंद देतात म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क अधिकारी अमृता चिकलगे, स्टुडन्ट डीन डॉ. वर्षा भोसले, प्रो अतुल शिंदे, प्रो. अनिता खराडे यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातील युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.