मेढा : मेढा नगरपंचायत निवडणुकीत सदस्यपदांसाठी दाखल 102 उमेदवारी अर्जांपैकी 74 अर्ज मंगळवारी (दि. 18) झालेल्या छाननीमध्ये वैध ठरले, तर 28 अर्ज अवैध ठरले. नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या 11 पैकी 10 अर्ज वैध ठरले आहेत. पूजा वारागडे यांच्याकडे भाजपचा ए, बी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला.
प्रभाग 3 मधील शिवसेनेच्या उमेदवार द्रौपदा मुकणे आणि 10 मधील भाजपचे उमेदवार हरिश्चंद्र तिवाटणे यांच्या उमेदवारी अर्जांवर हरकती घेण्यात आल्या होत्या. या हरकतींवर रात्री 8 वाजेपर्यंत निर्णय न झाल्याने ऐन थंडीत राजकीय वातावरण गरम झाले होते. अखेर हे दोन्ही अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी वैध ठरवले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. प्रभाग 1 ते 17 मधील 28 अर्ज अवैध ठरले. ज्यांनी पक्षांच्यावतीने अर्ज दाखल केले होते, परंतु पक्षांचे ए, बी फॉर्म मिळाला नाहीत, त्यांचे अर्ज बाद झाले. संबंधित उमेदवारांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले उमेदवार अर्ज वैध ठरले.