सातारा : जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असतानाही आदेशाचा भंग करुन तसेच हातात तलवार घेवून फिरताना आढळल्याप्रकरणी सुश्रीत तानाजी सावंत (वय 21, रा. सैनिक नगर, सदरबझार, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 4 रोजी माहुली गावच्या हद्दीत संगमनगर कॅनॉलच्या जवळ सावंत आढळून आला. त्याच्यावर पोलीस शिपाई मच्छिंद्रनाथ माने यांनी कारवाई केली. पोलीस हवालदार कदम तपास करत आहेत. तसेच दोन वर्षांसाठी हद्दपार असतानाही आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ऋतिक ऊर्फ बाबा अजय जाधव (वय 22, रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा) याच्यावर पोलीस कॉन्स्टेबल सचिन रिटे यांनी दि. 4 रोजी कारवाई केली. त्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आदेशाचा भंग प्रकरणी दोन युवकांवर कारवाई
by Team Satara Today | published on : 05 November 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
देगाव येथे गळफास घेऊन अल्पवयीन मुलाची आत्महत्या
August 14, 2026
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी वेळेच्या दुचाकी चालकावर गुन्हा
August 14, 2026