उबाठा शिवसेना गटाचे शिवतीर्थावर निषेध आंदोलन

पाकिस्तानच्या नापाक कारवायांच्या विरोधात घोषणाबाजी

by Team Satara Today | published on : 25 April 2025


सातारा : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने शिवसेना नेत्या छायाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पोवई नाका येथे पाकिस्तानने पहलगाम येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत पाकच्या ध्वजाची होळी केली. तसेच अतिरेक्यांना कठोर शासन करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 यासंदर्भात छायाताई शिंदे बोलताना म्हणाल्या, पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख उपनेते नितीनजी बानुगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जम्मू काश्मीर पेहलगाम येथील पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांवर झालेल्या हल्ल्यातील भारतीय पर्यटक नागरिकांना श्रद्धांजली आणि पाकिस्तानचा निषेध करण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवतीर्थ पोवई नाका सातारा येथे निषेध आंदोलन करण्यात आले आहे. 

याठिकाणी शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या विरोधात घोषणा देत केंद्र सरकारने ठोस कारवाई करावी आणि दहशतवादाचा समूळ नायनाट करावा, ही मागणी करण्यात आली. जम्मू काश्मीर पहेलगाम येथील हल्ला हे केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे, असेही या ठिकाणी ठासून सांगण्यात आले. 

यावेळी उपनेत्या छायाताई शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ धनावडे, त्याचप्रमाणे उप शहरप्रमुख गणेश अहिवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. आंदोलनामध्ये शिवसेना उपनेत्या सौ छायाताई शिंदे, सातारा जिल्हा संघटिका सौ. अमृताताई पाटील, उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ धनावडे, निमिष शहा, आरोग्य सेना, तालुका संघटिका संगीता जाधव, शहरसंघटक प्रणव सावंत, तालुका प्रमुख रमेश बोराटे, संतोष चव्हाण, सुनील पवार, सातारा शहर प्रमुख रवींद्र भणगे, शिवराज टोणपे, माजी शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर धोत्रे, शिवेंद्र ताटे, शहर आरोग्यसेना सुमित नाईक, उपसंघटक सादिक बागवान, उप तालुकाप्रमुख अक्षय धोंडे, उप शहर प्रमुख गणेश अहिवळे, माजी तालुकाप्रमुख अनिल गुजर, श्रीकांत पवार, मंगेश जाधव, अशितोष पारंगे, अक्षय जाधव, प्रशांत इंगळे, रामचंद्र साळुंखे, जानुजी साळुंखे आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शिवसैनिकांनी पाकिस्तान मुर्दाबाद... नीम का पत्ता कडवा है पाकिस्तान भडवा है...जला दो जला दो पाकिस्तान जला दो...मिटा दो मिटा दो पाकिस्तान मिटा दो, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या आणि पोवई नाक्यावरील परिसर दणाणून सोडला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दहशतवाद्यांचा आक्रमकपणे बिमोड केलाच पाहिजे
पुढील बातमी
सुरक्षाव्यवस्थेचा अभाव दहशतवादी हल्ल्यास कारणीभूत : राऊत

संबंधित बातम्या