जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी; किन्नर आराधी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साताऱ्यात निवेदन

by Team Satara Today | published on : 16 March 2026


सातारा  : पुणे येथे किन्नर बिपाशा उर्फ आकाश राजू मणिक्कम (रा. धावजी पाटील निवास गुरुनानक कॉलनी) कात्रज ही व्यक्ती जाणीवपूर्वक केंद्र समाजामध्ये मतभेद व जातीय भेद निर्माण करत आहेत. अशा व्यक्तीवर कठोर कारवाई करावी यासाठी किन्नर समाजाच्या आदिशक्ती फाउंडेशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

फाउंडेशनच्या सदस्यांनी पोवई नाक्यावरून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चालत जात जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेत खालील कारवाईची मागणी केली आहे. प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की, किन्नर समाज हा परंपरेने गुण्यागोविंदाने एकोप्याने व शांततेने राहतो. मात्र सदर व्यक्ती विविध ठिकाणी खळबळजनक विधाने करून जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. बिपाशा उर्फ आकाश राजू मणिक्कम यांनी जातिवाचक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. 

त्यामुळे समाजातील ऐक्य धोक्यात आले असून सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. पंढरपूर येथील किन्नर वैष्णवी वाघमारे यांच्याबाबत देखील वाद निर्माण करून किन्नर समाजात अनावश्यक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून किन्नर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोरेगावच्या ठाणेदारावरून विधान परिषदेत रणकंदन; पो.नि. घनश्याम बल्लाळ यांना बडतर्फ करण्याची मागणी
पुढील बातमी
सातारा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला; सभापतीपदी महेश गाडे, उपसभापतीपदी सुषमा जाधव

संबंधित बातम्या