अवैधरित्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा ; एक लाख 23 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 24 May 2026


सातारा : अवैधरित्या पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जकातवाडी गावच्या हद्दीत रुबान रफिक पठाण (रा. शनिवार पेठ, सातारा) याच्या ताब्यात एक स्टीलचे पिस्टल असल्याचे आढळून आले. याबाबत त्याला विचारले असता त्याने ते पिस्टल सुरज उंबरकर (रा. सैदापूर, सातारा) यांच्याकडून पन्नास हजार रुपयात खरेदी केल्याचे सांगितले. 

याप्रकरणी पठाण याच्याकडून पिस्टल, मोटरसायकल व दोन मोबाईल असा एक लाख 23 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पठाण व उंबरकर यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वरण भात न आवडल्याने आईवर चाकूने वार; मुलाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
वाई तालुक्यातील घटना; वृद्ध दाम्पत्याला मारहाण करुन चोरट्यांनी दीड लाखाचा ऐवज लंपास केला

संबंधित बातम्या