पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

by Team Satara Today | published on : 02 August 2025


मुंबई : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. देशभरातील सुमारे ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. 

पीएम किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याची रक्कम कधी जमा होणार याबाबत वेगवेगळ्या तारखा समोर येत होत्या. दरम्यान, आज  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाराणसी या लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुमारे २० हजार ५०० कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. ही रक्कम जमा केल्याचा संदेश लाभार्थी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आला आहे.

पीएम किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याची रक्कम या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर योग्य आणि अपडेटेड माहिती असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात  आली आहे,  

लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे की नाही, असं तपासा

-सुरुवातीला PM Kisan योजनेच्या https://pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.

- तेथील  Farmer Corner मध्ये जाऊन Beneficiary Status वर क्लिक करा.  

 -त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा कोड टाईप करा

- सर्व माहिती भरल्यानंतर Get Report वर क्लिक करून आपला स्टेटस चेक करा 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यात विविध उपक्रम राबवून महसूल सप्ताहाचा शुभारंभ
पुढील बातमी
किडनी फेल, डायबिटीस... अन् 172 आजारांना निमंत्रण

संबंधित बातम्या