सण म्हणजे सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याची परंपरा

ना. शिवेंद्रसिंहराजे : रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा

by Team Satara Today | published on : 31 March 2025


सातारा : रोजच्या कष्टकरी, धावपळीच्या आयुष्यातून थोडा विरंगुळा मिळावा आणि त्यातून आपली परंपरा आणि संस्कृती जोपासली जावी, यासाठी प्रत्येक सण उत्साहाने साजरा केला जातो. सण म्हणजे सामाजिक सलोखा, सामाजिक ऐक्य अबाधित ठेवण्याची परंपरा आहे. प्रत्येक सणामुळे आपले सामाजिक ऐक्य आणि बंधुत्व वृद्धिंगत व्हावे यासाठी सर्वानीच प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

रमजान ईद निमित्त ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहरातील ईदगाह मैदानावर भेट देऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुस्लिम समाजातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. शिवेंद्रसिंहराजेंनी बुधवार नाक्यापासून ईदगाह मैदानापर्यंत चालत जात मुस्लिम बांधवाना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वानीच ना शिवेंद्रसिंहराजेंसोबत फोटो काढले आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या. विविध कब्रस्थान आणि मशिदींच्या विविध प्रकारच्या विकासकामांसाठी नुकताच ५ कोटी निधी उपलब्ध करून घेतल्याचे ना. शिवेंद्रसिंहराजेंनी यावेळी स्पष्ट केले. मुस्लिम समाजाचे विविध प्रश्न वेळोवेळी आपण मार्गी लावले असून आगामी काळातही समाजाचे प्रश्न सोडवले जातील, असे ते म्हणाले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रेल्वे प्रवाशांसाठी मार्चऐवजी आता एप्रिलपर्यंत विशेष एक्स्प्रेस रेल्वे गाड्या
पुढील बातमी
एकास मारहाण प्रकरणी तीन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या