करंजे पेठ येथील श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनियर कॉलेजचा बारावीचा निकाल 96.55 टक्के

by Team Satara Today | published on : 02 May 2026


सातारा : करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनिअर कॉलेज मधील इयत्ता बारावीचा निकाल ९६.५५ टक्के लागला आहे.

 शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याचा ध्यास घेतलेल्या या संस्थेच्या जुनियर कॉलेजमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. कॉलेजचा मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल व समाजशास्त्र या विषयांचा निकाल 100% तर इंग्रजी विषयाचा 96.55% असून असे घवघवीत यश विद्यार्थ्यांनी संपादन केले आहे. या कॉलेजमधील सृष्टी बाळासाहेब जगदाळे ही 80.50%  टक्के गुण संपादन करून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली तसेच तृप्ती सचिन जाधव हिने 76% गुण मिळवून द्वितीय क्रमांक संपादन केला तर विकास मानसिंग सोनवणे याने 73.67% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये विद्यार्थ्यांचे प्रयत्न, कष्ट त्यांच्या पालकांचे सहकार्य, संस्था सचिव तुषार पाटील यांची प्रेरणा तसेच प्राचार्य अमरसिंह वसावे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे सर्वच प्राध्यापक यांचा मोलाचा वाटा आहे.

शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा सौ. वत्सला डुबल, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप, सचिव तुषार पाटील ,चेअर पर्सन सौ प्रतिभा चव्हाण, सर्वच माननीय संचालक, शिक्षक, पालक यांच्याकडून या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जमीन विक्रीचे आमिष दाखवून कोरेगावातील एकाची १ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक; दोन आरोपींना अटक

संबंधित बातम्या