स्वातंत्र्य लढ्यात सुभाषचंद्र बोस यांचे योगदान मोलाचे : डॉ. सुरेशराव जाधव

सातारा : स्वातंत्र्य लढ्यात अग्रभागी राहून इंग्रजी जुल्मी राज्यसत्ता उलथून टाकण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशात सशस्त्र लढा उभारून नवक्रांती घडविली. त्या स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान मोलाचे ठरले आहे, असे मत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांनी व्यक्त केले.

सुभाषचंद्र बोस यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त हुतात्मा स्मारक, सातारा येथे सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला अभिवादन आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, प्रा. विश्वंभर बाबर, अस्लम तडसरकर, अन्वर पाशा खान आदी उपस्थित होते.

डॉ. जाधव  पुढे म्हणाले की, तरुणाईमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवून त्यांनी स्वतंत्र्य लढ्याला सशस्त्र क्रांतीचे स्वरूप दिले. नवराष्ट्र उभारणीचा ध्यास घेऊन प्रत्येक देशवसियाच्या मनामध्ये नेताजींनी आत्मविश्वास राष्ट्रीय भावना जागृत करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अन्याय अत्याचार विरोधात बंड करायला शिकविले त्यांचे विचार देशाला आजही प्रेरित ठरत आहेत. इंग्रजीतून जुल्मी सत्ताधीशांना नेताजींच्या सशस्त्र लढा पुढे अखेर हार मानावी लागली अशा थोर स्वातंत्र्य सेनानी मुळेच देश आझाद झाला.

मागील बातमी
ग्रहांची परेड पाहण्यासाठी बालचमूसह पालकांचा प्रतिसाद
पुढील बातमी
'अजिंक्यतारा'चे सभासद निकम यांचा 'ऊस भूषण' पुरस्काराने सन्मान

संबंधित बातम्या