सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सहाजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर गोधळ घातल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित बनसोडे (वय 20, रा. वडगाव पाली), पृथ्वीराज साळुंखे (वय 24, रा. मंगळवार पेठ, सातारा), ओंकार माने (वय 18, रा. कारंडवाडी ता सातारा), विजय कांबळे (वय 21, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा), वेदांत देशमुख (वय 20, रा. कारंडवाडी), निखील शेडगे (वय 19, रा. अगापूर ता. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दि. 21 जानेवारी रोजी संशयित आपआपसांत मारामारी व आरडाओरडा करत असल्याने स्वत: पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.