काळ्याभोर केसांसाठी 'या' पद्धतीने करा कलौंजी बियांचा वापर

केस होतील सुंदर

हल्ली कमी वयातच महिलांसह पुरुषांचे सुद्धा केस पांढरे होतात. केस पांढरे होण्यामागे अनेक कारण आहेत. केस काळे आणि लांबलचक ठेवण्यासाठी अनेक महिला सतत काहींना काही करत असतात. कधी केसांना हेअरमास्क लावणे तर कधी हेअर कलर केसांना लावला जातो. अनेक महिला थंडीच्या दिवसांमध्ये केसांची निगा राखण्यासाठी केसांना वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट करून घेतात, मात्र या केमिकल ट्रीटमेंटचा फारकाळ केसांवर प्रभाव टिकून राहत नाही. तसेच पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी हेअर कलर करून घेतला जातो. मात्र केमिकल युक्त हेअर कलर फारकाळ केसांवर टिकून राहत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी कलौंजी बियांचा कशा प्रकारे वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पद्धतीने कलौंजी बियांचा वापर केल्यास काळेभोर आणि सुंदर होतील. 

केसांच्या वाढीसाठी कलौंजी बिया वापरण्याचे फायदे:

दैनंदिन आहारात कलौंजी बियांचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. या बियांमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, ओमेगा-3, ओमेगा-6  फॅटीअसिड्स, विटामिन ए इत्यादी अनेक घटक आढळून येतात. या बियांचा वापर केल्यामुळे केस मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते. अनेक महिला केसांच्या निरोगी वाढीसाठी कलौंजी बियांचा वापर करतात. यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होते.

कलौंजी बियांपासून हेअर कलर तयार करण्याची कृती:

साहित्य:

कलौंजी बिया

आवळा पावडर

भृंगराज

दही

कृती:

कलौंजी बियांपासून हेअर कलर तयार करण्यासाठी सर्वप्रथम, पॅनमध्ये कलौंजी बिया व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर भाजून घेतलेल्या बिया मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर वाटीमध्ये कलौंजी बियांची पावडर, आवळा पावडर, भृंगराज आणि दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार करून घेतलेला हेअर कलर केसांवर व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर 40 मिनिटं ठेवून केस पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होईल. शिवाय केस लांबलचक आणि सुंदर दिसतील.

घरगुती हेअर कलर लावल्यामुळे केसांना होणारे फायदे:

केसांच्या वाढीसाठी आवळा अतिशय फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळून येते, ज्यामुळे केसांची वाढ निरोगी होण्यास मदत होईल. आवळ्याचे सेवन केल्यामुळे केसांवर सकारात्मक परिणाम दिसून येतात. शिवाय दही केसांना मुलायम आणि चमकदार करण्यासाठी मदत करते. केसांच्या वाढीसाठी नियमित एका आवळ्याचे सेवन करावे.भृंगराज पावडरचा वापर केल्यामुळे केस तुटणे, केस गळणे इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

मागील बातमी
जगातील सर्वात शक्तीशाली हायड्रोजन ट्रेन
पुढील बातमी
मॅनेजरच्या घरात घुसून वाल्मीक कराडच्या मुलाने दाखवली बंदूक

संबंधित बातम्या