कॉ. शेख काका व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रा. डॉ. नीरज हातेकर यांचे दि २० रोजी व्याख्यान

by Team Satara Today | published on : 19 August 2025


सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रतिसरकारचे नेते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉ. शेख बंडू इनामदार उर्फ कॉ शेख काका आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संकल्पक शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवार दि. 20 ऑगस्ट रोजी सातारा येथे मुंबई विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे माजी प्रमुख सुप्रसिद्ध अर्थतज्ञ प्रा. डॉ. नीरज हातेकर यांचे सामाजिक चळवळी पुढील आव्हाने या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. 

परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती, सातारा व राष्ट्रीयता जागर अभियान सातारा यांच्या वतीने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. श्री छ प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या पाठक हॉल मध्ये बुधवार दि. 20 रोजी संध्याकाळी सहा वाजता प्रा डॉ नीरज हातेकर यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छ. शिवाजी महाविद्यालय सातारच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील असतील.‌

या कार्यक्रमास स्वातंत्र्यप्रेमी तसेच डॉ नरेंद्र दाभोलकर व कॉ शेख काका यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक संस्थांच्या वतीने विजय मांडके व मिनाज सय्यद यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारमध्ये आंदोलने डे..!
पुढील बातमी
शाळेत जाताना लहानग्यांच्या अंगावर कोसळले झाड

संबंधित बातम्या