सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सासरच्या चारजणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साक्षी हृतीक बनसोडे यांनी पती हृतीक बनसोडे, सासू ज्योती बनसोडे व सासरे विवेक बनसोडे (सर्व रा. करंजे, सातारा) यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. जानेवारी 2022 पासून वेळोवेळी जाचहाट केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.