नोकरीच्या आमिषाने वीस लाखांची फसवणूक; दोन जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 08 August 2025


सातारा : नोकरीच्या आमिषाने वीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 मार्च 2020 ते जुलै 2023 दरम्यान मंत्रालयामधून आरोग्य विभागामध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखवून मिलिंद वैजनाथ आचपळ, उमानंद वैजनाथ आचपळ, तसेच अजित किसन कचरे, राहुल बबन धायगुडे, सागर विठ्ठल पडळकर, साईराज शिवाजी वाघमोडे, सूर्यकांत निवृत्ती जाधव, शैलेश शिरीष क्षीरसागर, शुभम ज्ञानेश्वर कुंभार यांच्याकडून 20 लाख 25 हजार घेऊन नोकरी न लावता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष सदाशिव सुतार रा. सणबुर, ता. पाटण, जि. सातारा आणि महेश गंगाराम बंदरे रा. नवी मुंबई यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वेतणश्रेणी लागू करा; पेन्शनही द्या!
पुढील बातमी
इमारतीवरून पडलेल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

संबंधित बातम्या