सातारा : सातारा जिल्हा परिषदेमार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दलित, मागास, उपेक्षित कष्टकरी वर्गाचे सामाजिक, शैक्षणिक प्रबोधन करणाऱ्या संस्थेस पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
सदर पुरस्काराचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी २० फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. संस्थांनी सादर करावयाच्या प्रस्तावाच्या नमुन्याच्या प्रती शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. प्रस्ताव दाखल करणाऱ्या संस्थांकडे पोलिस अधीक्षक यांचा चारित्र्यपडताळणी दाखला असणे आवश्यक आहे. संस्थांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव मुदतीत २० फेब्रुवारी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत सादर करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक शबनम मुजावर यांनी केले आहे.