सातारा, दि. १४ : एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार करुन लग्नास नकार दिल्याप्रकरणी राहूल राजेंद्र निकम (वय ३०, रा. शामसुंदर बंगला, करंजे, सातारा) याच्या विरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बलात्काराची घटना जानेवारी २०२० ते मे २०२५ मध्ये वेळोवेळी घडली आहे. तक्रारदार युवतीचा संशयित राहूल निकम याने विश्वास संपादन केला. लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने त्याच्या राहत्या बंगल्यामध्ये तसेच कास रस्त्यावरील हॉटेल्समध्ये वेळोवेळी युवतीवर बलात्कार केला. यादरम्यान संशयिताने युवतीला मारहाण देखील केली आहे. तसेच युवती गरोदर राहू नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्या दिल्या आहेत. तक्रारदार युवतीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर संशयिताने फोन घेण्यास टाळाटाळ करुन लग्नाला नकार दिला. फसवणूक झाल्याने युवतीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.