सातारा बसस्थानकात आढळले नवजात स्त्री अर्भक

by Team Satara Today | published on : 29 November 2024


सातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानकात असलेल्या झुणका भाकर केंद्राजवळील कचरा कुंडीत स्त्री जातीचे चार ते पाच दिवसांचे नवजात अर्भक आढळून आले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी 28 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ही बाब उघडकीस आली. याप्रकरणी सौ.वंदना दिलीप भंडारे (वय ४०, रा. मल्‍हार पेठ, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार या एसटी स्‍टॅन्‍डमध्ये सफाई कामगार म्‍हणून काम करत आहेत. ही घटना दि. २८ नोव्‍हेबर रोजी दुपारी समोर आली आहे. सौ. वंदना भंडारे या एसटी स्‍टॅन्‍ड परिसरात काम करत होत्‍या. त्‍यावेळी त्‍यांना लहान बाळ रडत असल्‍याचा आवाज आला. मात्र रडणारे बाळ दिसत नव्‍हते. कचराकुंडीच्या दिशेने आवाज येत असल्‍याने तिकडे गेल्‍या असता त्‍यांना गुंडाळून ठेवलेल्‍या अवस्‍थेत लहान बाळ दिसले.

/* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin-top:0in; mso-para-margin-right:0in; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0in; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-fareast-font-family:"Times New Roman"; mso-fareast-theme-font:minor-fareast; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi;}

तक्रारदार वंदना भंडारे यांना बाळ कचराकुंडीत दिसताच त्‍यांनी तात्‍काळ ते बाहेर घेतले. बाळाची आई कुठे दिसते हे परिसरात पाहण्यास सुरुवात केली. परिसरात असणार्‍या नागरिकांना बाळाबाबतची माहिती दिली.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तीनजणांवर गुन्हा
पुढील बातमी
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा

संबंधित बातम्या