सातारा : भारतीय जनता पक्षाच्या सहा विधानसभा मतदारसंघातील 22 मंडलांच्या अध्यक्षांच्या निवडी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी आज जाहीर केल्या. जिल्हाध्यक्ष कदम यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. प्रिया शिंदे, विठ्ठल बलशेठवार, राहुल शिवनामे, विकास गोसावी, डॉ. अरुणा बर्गे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
धैर्यशील कदम म्हणाले, भाजपमध्ये तीन वर्षांनंतर मंडलाध्यक्ष ते पक्षाध्यक्ष निवडी केल्या जातात. आता मंडलाध्यक्ष निवडी झाल्या असून, त्यानंतर जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष व नंतर पक्ष अध्यक्षांच्या निवडी होतील. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, कराड दक्षिण, पाटण, फलटण व माण या सहा मतदारसंघातील 22 मंडलाध्यक्षांच्या निवडी झाल्या आहेत. यात 5 ओबीसी व 1 मागास प्रवर्गातील पदाधिकार्यांचा समावेश आहे.
वाई व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मंडलाध्यक्षांच्या निवडी लवकरच जाहीर केल्या जातील. काही नेत्यांना वेळ नाही, चर्चा सुरु आहेत, यामुळे या निवडी राहिल्या आहेत. त्या दोन दिवसांत जाहीर होतील, असेही कदम यांनी सांगितले.
भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी लवकरच निवडी होणार आहे, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर धैर्यशील कदम म्हणाले, एक वर्षाच्या कालावधीत मी पक्षासाठी काम केले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळाले आहे. पक्षाने संधी दिल्यास मी इच्छूक आहेत.
सातारा विधानसभा : अविनाश खर्शीकर (सातारा शहर मध्य), वैशाली टंगसाळे (सातारा शहर बाह्य), महेश गाडे (सातारा उत्तर), विजय गुजर (सातारा दक्षिण), संदीप परामणे (जावळी पूर्व), मारुती चिकणे (जावळी पश्चिम).
कोरेगाव विधानसभा : निलेश नलवडे (सातारा पूर्व), निलेश यादव (कोरेगाव), शिवाजी शेडगे (खटाव उत्तर).
कराड दक्षिण : राजेंद्र यादव (कराड दक्षिण मध्य), शंकर निकम (कराड दक्षिण पूर्व), प्रवीण साळुंखे (कराड दक्षिण पश्चिम).
पाटण : नंदकुमार सुर्वे (पाटण), रवींद्र पाटील (तारळे), चंद्रकांत भिसे (मल्हारपेठ), गणेश यादव (कुंभारगाव).
फलटण विधानसभा : अमित रणवरे (वाठार स्टेशन), विकास शिंदे (फलटण शहर), लक्ष्मण सोनवलकर (कोळकी).
माण विधानसभा : गणेश सत्रे (दहिवडी), प्रशांत गोरड (म्हसवड), अनिल माळी (खटाव).