शुध्द श्वासासाठी एकवटले सातारकर

हरित साताराचा नाविन्यपूर्ण उपक्रम

सातारा : नववर्षाच्या पहिल्या किरणांबरोबर एकच ध्यास, शुध्द श्वासअसा नारा देत आज शेकडो हातांनी अजिंक्यतारा किल्ल्यावरील रोपांना ओंजळभर पाणी देत नवसंजीवनी दिली. दर शनिवारी स्वेच्छेने एक तास श्रमदान करण्याचा संकल्प या निमित्ताने सोडण्यात आला.

हरित सातारा ग्रुपच्या पुढाकाराने वृक्ष संवर्धनाच्या उपक्रमाचा आज प्रारंभ झाला. वाढते शहरीकरण, कार्बन ओकणारी वाहने, जमिनीची होत असलेली धूप, बदललेले पर्जन्यमान या सर्वांमुळे सातारा शहराचे शहरात वायु प्रदूषणाचा धोका वाढला आहे या धोक्यापासून वेळीच सावध होण्यासाठी केवळ वृक्षारोपण करून भागणार नाही तर वृक्ष संरक्षण व संवर्धन हाती घेणे गरजेचे आहे या गरजेतूनच अजिंक्यतारा किल्ल्यावरील खालच्या मंगळाच्या परिसरातील रोपांना पाणी देऊन नवसंजीवनी देण्याचा उपक्रम आज सुरू झाला.

वृक्षारोपणाच्या विविध संस्थांच्या कार्यक्रमांना कार्यक्रम आपण पाहतो तथापि वृक्ष संवर्धनासाठी रोपांना पाणी देण्याचा हा पहिलाच जाहीर उपक्रम आपण पाहत असून तो इतरांनी इतरांसाठी अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार उपस्थित नागरिकांनी या निमित्ताने बोलताना काढले.

यावेळी माजी नगरसेवक भालचंद्र निकम, इम्तेखाब बागवान, सागर पावशे, शाहूपुरी विकास आघाडीचे भारत भोसले, अंनिस प्रशांत पोतदार, उदय चव्हाण, कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गायकवाड, वेद अकादमीचे सागर लोहार, नरेंद्र महाबळेश्वरकर, शुभदा महाबळेश्वरकर, महिमा कांबळे, शिल्पा कोष्टी, विनिता गोखले, सौ विसापुरे, माजी मुख्याध्यापक सुधीर विसापूरे, वनराज कुमकर, डॉ. शरद पाटील, प्रवीण शेळके, सादिक खान, प्रा. डॉ. जमीर मोमीन, डॉ शुभांगी गायकवाड,डॉ. दीपक माने, पत्रकार तुषार तपासे, इम्तियाज मुजावर, जय गायकवाड, सीता चव्हाण, छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्रा.केशराव पवार व एनसीसी छात्र, तसेच हरित साताराचे कन्हैयालाल राजपुरोहित भालचंद्र गोताड, दिलीप भोजने, दत्तात्रय चाळके, प्रकाश खटावकर आदी सातारकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दर शनिवारी सकाळी सात ते साडेआठ या वेळात अजिंक्यताराच्या मंगळाई टेकडीवर झाडांना पाणी घालण्याचा उपक्रम राबवला जात आहे. हा उपक्रम एक जून पर्यंत चालणार आहे.यात जास्तीत जास्त नागरिकांनी श्रमदान करावे असे आवाहन हरित सातारा ग्रुपच्या वतीने करण्यात आले.


मागील बातमी
महाराष्ट्रातील गडकोट किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांवर कायमस्वरुपी भगवा झेंडा उभारावा
पुढील बातमी
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या