सातारा : तडीपारीचे आदेश असतानाही दोन वेगवेगळ्या घटनेत दोघेजण पोलिसांना फिरत असल्याचे दिसल्याने त्यांना पकडून त्यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तडीपारीचे आदेश असतानाही सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेले येथे फिरत असलेल्या यश सुभाष साळुंखे (रा.मोळाचा ओढा, सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द तडीपार आदेश भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दि. 2 ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे.
दुसरी कारवाई अर्जुन दौलत पवार (वय 26, रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा) याच्यावर करण्यात आली आहे. पोवई नाका येथे तो असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला पकडण्यात आले. सातारा शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.