कराड : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामधील महापारेषण आयोजित अउदा प्रकल्प नि संवसु परिमंडल कराड आंतर-मंडलीय नाट्य स्पर्धा २०२४ यावर्षी सातारा जिल्ह्यातील कराड येथे होणार आहे. त्याचे उद्घाटन 29 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे.
महापारेषण मधील सर्वच कर्मचारी हे वर्षाचे 365 दिवस वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी नियमित काम करत असतात. कोरोना मध्ये सुद्धा आपल्या जीवाची परवा न करता या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन काम केले. याच कर्मचाऱ्यांमधील अनेक कलागुणांना वाव मिळावी यासाठी दरवर्षी महापारेषण विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून यावर्षी नाट्य स्पर्धा कराड येथे आयोजित करण्यात आली आहे. या नाट्य स्पर्धेसाठी सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातून महापारेषणचे कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होणार आहेत.
कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मूर्तीसदन (टाऊन हॉल) येथे दोन दिवस या नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महापारेषण यांच्या शुभहस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून तर प्रमुख उपस्थिती म्हणून सुगत गमरे संचालक सतिश चव्हाण संचालक, तृप्ती मुधोळकर संचालक, मंगेश शिंदे, अविनाश निंबाळकर संचालक, भरत पाटील मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तर या कार्यक्रमाचे आयोजन शिल्पा कुंभार मुख्य अभियंता, कराड परिमंडल यांच्यासमवेत चिदाप्पा कोळी अधीक्षक अभियंता कराड, प्रांजल कांबळे अधीक्षक अभियंता कोल्हापूर ,श्रीकृष्ण नवलाखे, कोल्हापूर, अशोक सागरे, राजेश केळवकर, संजय किंकर प्रशांत चौधरी, राजू कोळी यांच्यासह नाट्य स्पर्धा आयोजन समिती करणार आहे.
दोन दिवस या ठिकाणी पाच जिल्ह्यातून आलेले महापारेषणचे कर्मचारी व अधिकारी आपली विविध कला नाटकाच्या माध्यमातून सादर करणार आहे.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |