सातारा : शिक्षक शिक्षकेतर राज्य सरकारी निमसरकारी नगरपालिका अंशकालीन कंत्राटी विविध कर्मचारी संघटनांच्या कृती समितीच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार दरम्यान धरणेआंदोलन करण्यात आले .विविध संघटनांच्या सदस्यांनी घोषणांचे फलक घेऊन राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकरी असंघटित कामगार तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध कायद्यांच्या संदर्भानेकामगार वर्ग अडचणीत आला आहे. या धोरणांचा निषेध करण्यात आला.
जिल्हा समन्वय समिती निमंत्रक नेताजी दिसले सरचिटणीस आयुष्यमान गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या समितीमध्ये मेघा अशोक पाटील श्रीमती गीता मुरलीधर बोधे प्रकाश बळवंत घाडगे प्रमोद गणपतराव चतुर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनाविषयी बोलताना नेताजी दिसले म्हणाले, देशात 26 राज्यात सेवानिवृत्तीचे वय 60 करण्यात आले आहे मग महाराष्ट्रामध्ये अद्याप तो नियम का लागू नाही केंद्र शासनाने एक जुलै 2025 पासून तीन टक्के वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना लागू केला आहे महागाईचा विचार करता राज्य कर्मचाऱ्यांना तीन टक्के वाढीव महागाई भत्ता त्वरित मंजूर करण्यात यावा मात्र तो अद्यापही करण्यात आलेला नाही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत बरेच प्रश्न प्रलंबित आहेत 10 20 30 सेवा अंतर्गत प्रगती योजना केवळ 2005 पूर्वी नियुक्त अंशतः अनुदानित शिक्षकांना लागू आहे त्यानंतरच्या शिक्षकांना ही योजना नाही चतुर्थश्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवर बंदी हे अव्यवहार्य धोरण आहे. या धोरणांचा पुनर्विचार व्हावा. राज्य शासनाने या संदर्भात तातडीने विचार करावा अशी त्यांची मागणी आहे .आंदोलन कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करत प्रवेशद्वार रोखण्याचा प्रयत्न केला हे आंदोलन सनदशीर मार्गाने पार पडले यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.