सातारा : येथील रयत सेविका श्रीमती सुरेखा दादा दाते (उपशिक्षिका) यांच्यावर झालेल्या महिला अत्याचार विरोधात त्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलनाला बसल्या आहेत. या आंदोलनाची दखल शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या वतीने घेण्यात आली. आघाडीच्या महिलांनी दाते यांची विचारपूस करत त्यांची तक्रार ऐकून घेतली.
श्रीमती सुलोचनाताई पवार (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), सौ. मीनाक्षीताई मोरे (संजय गांधी निराधार समिती सदस्य, सातारा), सौ. तेजश्री यादव (महिला संघटिका सातारा शहर) सौ नीताताई लोंढे (कराड दक्षिण तालुका प्रमुख) आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.
शिवसेना महिला आघाडी यांनी रयत शिक्षण संस्थेजवळ सुरू असलेल्या उपोषण स्थळी भेट देऊन विचारपूस केली. यावेळी दाते यांनी आपल्या वर संस्थेकडून वेळोवेळी अन्याय झाला आहे. याबाबत अनेकवेळा तक्रार करून देखील दखल घेतली गेली नाही, असे सांगितले. यावेळी श्रीमती दाते यांनी आपल्या मागणीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नावे निवेदन यावेळी दिले. तसेच याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष देऊन मला न्याय मिळून द्यावा, अशी विनंती सुलोचना पवार व मीनाक्षीताई मोरे यांच्याकडे केली.
रयत सेविकेच्या आंदोलनाची शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दखल
by Team Satara Today | published on : 24 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा