मुंबई : 'गल्ली बॉय फेम' बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी 'युध्रा' या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. येत्या २० सप्टेंबरला त्याचा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण, या चित्रपटासाठी सिध्दांतने प्रचंड मेहनत घेतल्याचं कळतंय. सिद्धांतसोबत अभिनेत्री माल्विका मोहनन देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक रवि उदयवार यांनी एका मुलाखतीत त्याच्या ट्रान्स्फॉर्मेशनबद्दल खुलासा केला आहे.
या चित्रपटासाठी सिद्धांतने तब्बल २० किलो वजन कमी केलं आहे. शिवाय त्याने मार्शल आर्ट्सच प्रशिक्षणही घेतल्याचं त्यांनी सांगितलं. सिद्धांतने आपल्या भूमिकेत परफेक्ट दिसण्यासाठी जीवापाड मेहनत केली असा खुलासा त्यांनी केला.
सिद्धांत-मालविका जोडीची सर्वत्र चर्चा:
'युध्रा' चित्रपटामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिनेत्री माल्विका मोहनन यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. अलिकडेच युध्रा मधील साथिया हे गाणं रिलीज झालं. त्यामधील ते दोघे इंटिमेट सीन्समुळे प्रचंड चर्चेत आले. युद्धा मध्ये अभिनेता राम कपूर, राज अर्जून आणि राघव जुयल अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळते आहे.
सिद्धांतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, त्याने 'गल्ली बॉय', 'गहराईयॉं' तसचे 'खो गये हम कहॉं' या चित्रपटांमध्ये कम केलं आहे.