सातारा : सुमारे दोन लाख रुपये किंमतीच्या टेलिकॉम कंपनीच्या साहित्याची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 ते 16 जून दरम्यान अमर लक्ष्मी चौक, नवीन एमआयडीसी येथील जाधव ट्रेडर्स दुकानाच्या गेटच्या आतमध्ये मोकळ्या प्लॉटमध्ये ठेवलेले जिओ टेलिकॉम कंपनीमध्ये लागणारे दोन लाख रुपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.