मसाप, शाहूपुरी शाखेस आज पुरस्कार वितरण

by Team Satara Today | published on : 13 August 2025


सातारा : येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस कै. जयश्री यशवंत कारखानीस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ  कर्तृत्व गौरव पुरस्कार देण्यात येतो. साताऱ्यात मराठी साहित्य चळवळ रुजवणाऱ्या, साहित्य क्षेत्रात राज्यात साताऱ्याचे नाव उज्जवल करणाऱ्या मसाप, शाहुपुरी शाखेस यंदाचा कर्तृत्व गौरव  पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण बुधवार दि. १३ रोजी सायंकाळी ६ वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये होणार असल्याची माहिती मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी दिली.

पत्रकात, मसाप शाहुपुरी शाखा गेल्या १६ वर्षांपासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेचे १४ वर्षे विनोद कुलकर्णी हे अध्यक्ष होते. त्यांचे नेतृत्व, मार्गदर्शनाखाली या शाखेने नाविन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून साताऱ्यातील साहित्य क्षेत्राला नवसंजीवनी दिली आहे. या सर्व कार्याचा गौरव म्हणून कै. जयश्री यशवंत कारखानीस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कर्तृत्व गौरव पुरस्कार मसाप शाहुपुरी शाखेस जाहीर करण्यात आला होता. या पुरस्काराचे वितरण बुधवार दि. १३ रोजी सायंकाळी ६ वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये होणार आहे.  कराड येथील सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन नगरवाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर, उपाध्यक्ष अतुल दोशी, विश्वस्त समितीचे अध्यक्ष अनंत जोशी, कार्यवाह व सर्व संचालक मंडळाने केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विनापरवाना कीटकनाशक विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा
पुढील बातमी
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

संबंधित बातम्या