सातारा : जुगार प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास प्रसाद नामदेव जाधव रा. यादोगोपाळ पेठ, सातारा हे तेथीलच खडकेश्वर मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या अपार्टमेंटच्या आडोशाला जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण बारा हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.