09:12pm | Dec 21, 2024 |
सातारा : दिनांक 19 रोजी परळी मध्ये एका डॉक्टरांच्या क्लिनिकच्या वरील घरातून अज्ञाताने तीन लाख दहा हजार रुपये घरफोडी करून चोरून नेल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती सातारा तालुका पोलिसांच्या डीबी पथकाने या गुन्ह्याची उकल केवळ बारा तासात करून एका महिलेस अटक केली आहे. महिलेकडून गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वैशाली रामदास ढेपे रा. परळी, ता. सातारा असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. 19 डिसेंबर रोजी तक्रारदार डॉ. मुराद आलम मुलाणी रा. परळी, ता. सातारा यांनी मुलाच्या शिक्षणासाठी क्लिनिकच्या वरील घरात असलेल्या बेडरूम मधील कपाटात ठेवलेले त्यांचे दहा लाख दहा हजार रुपये घरफोडी करून अज्ञाताने चोरून नेल्याचा गुन्हा सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी या गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्याबाबत सूचना सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला दिल्या होत्या. पथकाने या आरोपीची गोपनीय माहिती मिळवून एका संशयित महिलेस परळी, ता. सातारा येथून ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता ही महिला मुलाणी यांच्या घराची साफसफाई करण्यासाठी येत असते. तसेच तिने त्यांच्या घरातून तीन लाख दहा हजार रुपये चोरल्याची कबुली दिली. यानंतर तिच्याकडून तीन लाख दहा हजार रुपये रोख रक्कम ताब्यात घेऊन तिला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे करीत आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर उपविभागीय अधिकारी राजीव नवले सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, सहाय्यक फौजदार वायदंडे, पोलीस हवालदार संदीप कर्णे, दादा स्वामी, शिखरे, महिला पोलीस हवालदार मंडले, पोलीस नाईक प्रदीप मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडव, शिवाजी डफळे यांनी सहभाग घेतला.
परळीतील घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ बारा तासात उकल |
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |