मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. यामुळे सीमा भागांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने काल रात्री भारताच्या सीमा भागातील राज्यांवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचे हे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत. यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राज्यातील सुरक्षेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक देखील पार पडली आहे. दरम्यान, मुंबईतील टाटा हॉस्पिटलला धमकीचा मेल आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. मात्र मुंबईतील टाटा हॉस्पिटल बाबत मोठी अपडेट समोर येत आहे. टाटा हॉस्पिटलला धमकीचा मेल आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
