सातारा : सातारा शहरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 ते 12 जानेवारी दरम्यान नवनाथ जगन्नाथ चव्हाण रा. पॉवर हाऊस, मंगळवार पेठ, सातारा यांच्या बजाज पल्सर दुचाकी क्र. एमएच 11 बीएन 7651 आणि स्प्लेंडर मोटरसायकल क्र. एमएच 11 सीएन 0244 अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार इष्टे करीत आहेत.