मुंबई : आम्हीही त्यांच्यासोबत होतो. एकदा फसलो. दुसऱ्यांदा फसलो. तिसऱ्यांदा फसणार नाही. या लोकांचा एकच कारभार आहे, तो म्हणजे देशाला अशिक्षित ठेवा. अंधभक्त बनवा. शिक्षणापासून वंचित ठेवा. आम्ही अंधभक्त राहू तर या देशाच्या मातीचे राहू. शाहू-फुले-आंबेडकरांचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर छत्रपती शिवाजी महाराजांचे राहू. आम्ही झुकणार नाही. वाकणार नाही. गुलाम होणार नाही, असा एल्गार उद्धवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंनी केला.
असे एकामागोमाग एक पेपर फुटत आहेत. एमपीएससीसाठीही दरवर्षी आंदोलने करावी लागत आहेत. आपण सगळे इथे सोनम वांगचुक या आपल्या हिरोसाठी जमलो आहोत. इथे कोणत्याही एका पक्षाचे लोक आलेले नाहीत, तर विविध संघटनांचे लोक आले आहेत. देशाच्या भविष्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यावे लागेल. देशभरात सगळे युवा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत, असे सांगत आमदार आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला.
नीट पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे. २० दिवस उपोषण आंदोलन करत असलेल्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी यांनी येथून हलवत रुग्णालयात दाखल केले. सोनम वांगचुक यांना जंतर मंतर येथून हटवल्यानंतर उद्धवसेनेने शिवाजी पार्क येथे आंदोलन करत समर्थन दिले.
आम्हीही त्यांच्यासोबत होतो. एकदा फसलो. दुसऱ्यांदा फसलो. तिसऱ्यांदा फसणार नाही. या लोकांचा एकच कारभार आहे, तो म्हणजे देशाला अशिक्षित ठेवा. अंधभक्त बनवा. शिक्षणापासून वंचित ठेवा. आम्ही अंधभक्त राहू तर या देशाच्या मातीचे राहू. शाहू-फुले-आंबेडकरांचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर छत्रपती शिवाजी महाराजांचे राहू. आम्ही झुकणार नाही. वाकणार नाही. गुलाम होणार नाही, असा एल्गार आदित्य ठाकरेंनी केला.
दरम्यान, देशात अनेक गोष्टी घडत आहेत. इस्रोच्या १०० शास्त्रज्ञांनी राजीनामा दिला आहे. जगात वेगवेगळ्या कंपन्यात लोक जात आहेत. आपल्याकडे इस्रोचे शास्त्रज्ञ राजीनामा देत आहेत. यांना इस्रो सांभाळता येत नाही. २०२२ पर्यंत देशाची परिस्थिती बदलणार होते. विद्यार्थ्यांना लुटत आहेत. इथेनॉलच्या माध्यमातून लुटत आहेत. ही लूट थांबवायची आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.