मिग-२१ ची निवृत्ती

1965 च्या भारत–पाक युद्धापासून ते बालाकोट एयर स्ट्राइक पर्यंत दमदार कामगिरी करणारे मिग –21 भंगारत जाणार नाही

by Team Satara Today | published on : 26 September 2025


नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेमध्ये मैलाचा दगड ठरलेले आणि 1965 च्या भारत पाक युद्धापासून बालाकोटच्या एअर स्ट्राइक पर्यंत दमदार कामगिरी करणारे मिग–२१ हे फायटर जेट 62 वर्षाच्या प्रदीर्घ आणि गौरवशाली सेवेनंतर आज स्कोड्रॅन्स मधून अधिकृतपणे सेवानिवृत्त झाले आहे.

मिग –२१ फायटर जेट 1963 मध्ये भारतीय हवाई दलामध्ये झाले होते दाखल झाले होते. सोव्हिएत युनियनने बनवलेले हे पहिले सुपरसोनिक जेट 1963 मध्ये भारतीय वायुसेनेत दाखल झाले होते. 1965 आणि 1971 च्या युद्धांमध्ये, 1999 च्या कारगिल संघर्षात आणि 2019 च्या बालाकोट एअर स्ट्राईकमध्येही मिग-21 ने आपला पराक्रम दाखवला होता.

मिग-21 च्या निवृत्तीमुळे आता भारतीय वायुसेनेकडे केवळ 29 फायटर स्क्वाड्रन शिल्लक राहिले आहेत, तर देशाच्या संरक्षणासाठी 42 स्क्वाड्रनची आवश्यकता आहे. मिग-21 च्या शेवटच्या दोन स्क्वाड्रन, नंबर 23 (पँथर्स) आणि नंबर 3 (कोब्रास) ला नंबर प्लेटेड केले जाईल. याचा अर्थ या स्क्वाड्रन्सची प्रतिष्ठा आणि वारसा कायम ठेवून, त्यांच्या जागी येणाऱ्या नव्या विमानांना हेच ऐतिहासिक क्रमांक दिले जातील. नंबर 3 स्क्वाड्रनला आता एलसीए मार्क 1ए (LCA Mark 1A) तेजस फायटर विमान मिळेल.

रिटायरमेंटनंतर MiG 21 चं काय होणार?

सेवानिवृत्त झाल्यावर हे 'वॉर हॉर्स' विमान भंगारात जाणार नाही, तर त्यांना नवे जीवन मिळणार आहे. या विमानांची नाल एअरबेस'वर संपूर्ण तपासणी होईल. त्यातील सुस्थितीत असलेले सुटे भाग बाजूला काढले जातील आणि विमानांचे सांगाडे संग्रहालये, शैक्षणिक संस्था आणि प्रशिक्षण केंद्रांना दिले जातील. हे सांगाडे मिळवण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला हवाई दलाच्या मुख्यालयात अर्ज करावा लागेल. अशी माहिती हवाई दलाच्या प्रवक्त्याकडून माध्यमांना देण्यात आली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ई-केवायसीचे पोर्टला अनेक अडचणी येऊ लागल्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये नाराजी
पुढील बातमी
हेल्दी पदार्थ असूनही जर कुकिंग ऑईल खराब असेल तर?

संबंधित बातम्या