ऐतिहासिक यश, भारताचं पहिलं खाजगी रॉकेट विक्रम-१ चं यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अभिनंदन

by Team Satara Today | published on : 18 July 2026


हैदराबाद : अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताच्या खात्यात आज आणखी एक ऐतिहासिक यश जमा झाले आहे. हैदराबाद  येथील खाजगी अंतराळ  कंपनी स्कायरूट  एअरोस्पेसने आज आपलं पहिलं ऑर्बिटल लॉन्च व्हेईकल विक्रम-१ ला यशस्वीरीत्या  प्रक्षेपित करून अंतराळात सुखरूपपणे स्थापित केले. विक्रम -१ ने ४५० किमी उंचीवर पृथ्वीच्या खालच्या कक्षेत  पेलोड यशस्वीरीत्या स्थापित केले.

या मोहिमेला मिशन आगमन असं नाव देण्यात आलं होतं. विक्रम-१ ला आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील प्रक्षेपण स्थळावरून यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आले. भारतातील कुठल्याही खाजगी कंपनीने स्वत: विकसित केलेल्या ऑर्बिटल रॉकेटच्या माध्यमातून कृत्रिम उपग्रहांना स्थापित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याबरोबरच खाजगी एअरोस्पेस कंपनीने यशस्वीरीत्या रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा अमेरिका आणि चीननंतरचा तिसरा देश बनला आहे.

भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावर  विकसित करण्यात आलेलं २४ मीटर लांबीचं विक्रम-१ हे रॉकेट पूर्णपणे हलक्या कार्बन कॉम्पोझिटपासून तयार करण्यात करण्यात आलं आहे. यात  तीन  सॉलिड फ्युएल स्टेज आणि एक लिक्विड ऑर्बिटल अॅडजेस्टमेंट मॉड्युलद्यावे ऑपरेट झालं आहे. सुमारे ३५० किलो पेलोड  ४५० किमी उंचीवर असलेल्या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत नेऊन स्थापित करण्याची या रॉकेटमध्ये क्षमता असते.  

विक्रम-१ रॉकेटद्वारे अंतराळात उपग्रह यशस्वीरीत्या स्थापित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या  मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वांचं कौतुक करताना हे ऐतिहासिक यश असल्याचं म्हटलं आहे. ही मोहीम देशातील तरुणांची प्रतिभा, इनोव्हेशन आणि उद्यमशिलतेचं प्रतीक आहे. तसेच २०२० मध्ये लागू झालेल्या अंतराळ क्षेत्रातील सुधारणांच्या सकारात्मक परिणामांना या मोहिमेने समोर आणले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्तम काम करा, नैतिकता जपा; तुकाराम मुंढे यांचं तरुणांना आवाहन, शफी पठाण लिखित ‘तुकाराम’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन
पुढील बातमी
दहिवडीत नगरपंचायतीच्या आरोग्य सभापतींचं घर फोडलं; ११ तोळे सोने, अर्धा किलो चांदीसह लाखोंची रोकड लंपास

संबंधित बातम्या