सातारा : २०२४ च्या विधानसभा निवडणुकी वेळी कराड उत्तर मध्ये ऐतिहासिक सत्तांतर झाले. आ. मनोज घोरपडे यांनी विजय संपादन केला आणि प्रथमच भाजपचा आमदार कराड उत्तरला मिळाला. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. सत्ताधारी पक्षासोबत असल्याशिवाय विकासाला चालना मिळणार नाही आणि आमदार म्हणून मनोज घोरपडे यांचा विकास कामाचा सपाटा पाहून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कराड उत्तर मधील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष विक्रमबाबा पावसकर, आमदार मनोज घोरपडे, यांच्यासह रहिमतपुरचे माजी विरोधी पक्ष नेते निलेश माने, मंडलाध्यक्ष तुकाराम नलावडे, रणजीत माने, अमोल पवार, राहुल पाटील, महेश चव्हाण, दत्ता शेलार यांची यावेळी उपस्थिती होती.
रहिमतपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक विक्रमसिंह माने, साहेबराव माने, विकास तुपे, माजी नगराध्यक्ष प्रशांत भोसले, निर्मला जिरंगे, कल्याणराव डुबल, विजयकुमार चव्हाण, बाळासाहेब उर्फ संदीप पवार, उद्योजक धनाजी माने, अवधूत डुबल, मिलिंद सुर्वे, पराग राम उघडे, अजय थोरात, अजित चव्हाण, पुनम पाटील, वेदांतिका डुबल, संगीता डुबल, राजेंद्र जगदाळे, महेश पवार, राजेंद्र जाधव, श्रीकांत कांबळे , सायराबी संदे, संदीप थोरात, बबन जगदाळे, अमोल फडतरे सरपंच बेलेवाडी सुनील पाटणकर, बबन पाटणकर, संजय डुबल, गजानन सुर्वे, युवा उद्योजक मनोज डुबल, तुषार जाधव, महेश पाटील, जयवंत पाटील, अक्षय पाटील, सचिन यादव, शिवाजी मुंडे, योगेश मगरे, नाना देसाई, अमर पाटील , सोमेश्वर पाटील , इंद्रजीत कदम ,विष्णू गायकवाड, पोपटराव निकम, तुकाराम निकम, किसन निकम, रमजान मुलाणी ,राजेंद्र पवार, धनाजी कदम, रशीद नदाफ, सुहास जाधव बाळासाहेब घाडगे या सर्वांनी आ. मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रवेश केला.
यावेळी संभाजी पिसाळ ,निलेश डुबल तुषार चव्हाण ,गौतम जाधव, वैभव चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.