साताऱ्यात तापमानाचा पारा 42 अंशांच्या पार; नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये

महाबळेश्वरमध्ये तापमान ३४.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले

by Team Satara Today | published on : 16 April 2026


सातारा :  जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढलाय. माण तालुक्यात सर्वाधिक 42 अंश तापमानाची नोंद झालीय. सातारा शहरातही पारा 41 अंशांवर गेल्याने पोवई नाका परिसरातील वर्दळ मंदावलीय. वाढत्या उष्णतेमुळे प्रशासनाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन केलंय. उष्णतेपासून बचावासाठी नागरिक आता शीतपेयांच्या दुकानांकडे वळताना दिसतायत. या पार्श्वभूमीवर, वाढत्या उष्णतेचा परिणाम टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता लक्षणीय वाढली असून तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात चढला आहे. वाढत्या उकाड्यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. सातारामध्ये सकाळी आणि सायंकाळी काही प्रमाणात हालचाल दिसून येत असली तरी दुपारच्या सुमारास उष्णतेमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. रस्त्यालगत असलेल्या थंडपेयांच्या दुकानांवर मात्र नागरिकांची गर्दी वाढत असून अनेकजण सावलीचा आसरा घेताना दिसत आहेत.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांमध्ये तापमानात लक्षणीय फरक आढळून येत आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात तापमान सुमारे ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सातारा शहरात ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये तापमान ३४.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बालसंगोपन योजनेंतर्गत ९७ लाखांच्या अनुदानाचे वाटप; हजारो बालकांना मोठा आधार, जिल्हा महिला व बाल विकास विभागाची माहिती
पुढील बातमी
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर; मोदी सरकारला मोठा धक्का

संबंधित बातम्या