करंजे नाक्यावर जुगार अड्ड्यावर छापा; ९४० रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त

by Team Satara Today | published on : 22 January 2026


सातारा  : शाहूपुरी पोलिसांनी दि. २० रोजी करंजे नाका येथे प्रमिला मंगल कार्यालयाच्या पाठीमागील रस्त्यालगत असलेल्या ओढ्याजवळ जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत ९४० रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.याप्रकरणी प्रकाश तात्याबा इंगळे (वय ६२, रा. पिंपळगाव, ता. जि. सातारा), शेखर राजाराम परदेशी (वय ५६, रा. पावर हाऊस, कोरेगाव) व नितीन अनिल कुराडे (रा. एकता कॉलनी, करंजे पेठ, सातारा) यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस शिपाई संग्राम फडतरे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिह्यात भाजपचे 60 ठिकाणी झेडपीसाठी तर 118 ठिकाणी पंचायत समितीसाठी उमेदवार
पुढील बातमी
सातारा शहरात महिलेचा विनयभंग व मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा

संबंधित बातम्या