गुरुकुल स्कूलची इयत्ता 10 वीच्या परीक्षेत 100 टक्के निकालाची परंपरा कायम

कु. संचिता सचिन घोडके 100 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम

by Team Satara Today | published on : 14 May 2025


सातारा : नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या एस.एस.सी बोर्डाच्या परीक्षेत शाहूनगर, गोडोली, सातारा येथील गुरुकुल स्कूलचा 100 टक्के निकाल लागला असून शाळेतील कु. संचिता सचिन घोडके हिने 100 टक्के गुण प्राप्त करून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.

याही वर्षी गुरुकुल स्कूलने गुणवतेमध्ये बाजी मारली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या गुरुकुल स्कूलने सलग पंधराव्या वर्षी 100 टक्के निकालाची उज्वल परंपरा यावर्षीही अखंड ठेवली आहे. शाळेचा सरासरी निकाल 87.54 टक्के लागला आहे.

प्रथम येणार्‍या 5 विद्यार्थ्यांची माहिती पुढीलप्रमाणे -

कु. संचिता सचिन घोडके 100 टक्के गुण (शाळेत प्रथम क्रमांक),

कु. अलंकृता रमेश मोरे 19.00 टक्के गुण (शाळेत द्वितीय क्रमांक),

कु. प्रांजल दीपक पवार 98.60 टक्के गुण (शाळेत तृतीय क्रमांक),

कु. सेल्वी निरंजन शेजवलकर 18.40 टक्के गुण (शाळेत चौथा क्रमांक),

कु. इशिता सागर सरडे 98.00 टक्के गुण (शाळेत पाचवा क्रमांक)

कु. वेदांतिका गौरव आवडे 18:00 टक्के गुण (शाळेत पाचवा क्रमांक)

यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सचिव आनंद गुरव, अर्जुन चोरगे, ऍड. ऐश्वर्या चोरगे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. शीला वेल्हाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुराधा कदम, उपमुख्याध्यापिका सौ. सोनाली तांबोळी, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे, वर्गशिक्षिका सौ. मृणालिनी अलगुडे, सौ. ललिता कारंडे, सौ. योगिनी काळे यांनी अभिनंदन केले आहे.

या एस.एस.सी बोर्डाच्या परीक्षेत गुरुकुल स्कूलचे 123 विद्यार्थी बसले होते. यापैकी 109 विद्यार्थी डिस्टींगशन मार्काने उत्तीर्ण झाले असून 95 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे एकुण 23 विद्यार्थी, 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे एकुण 38 विद्यार्थी, 80 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे एकुण 38 विद्यार्थी, 70 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे एकुण 24 विद्यार्थी आहेत. तसेच संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळवणारे 6 विद्यार्थी, गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवणारा 1 विद्यार्थी, समाजशास्त्र विषयात 100 पैकी 100 गुण मिळवणारे 2 विद्यार्थी आहेत.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या सौ. शीला वेल्हाळ, सौ. अनुराधा कदम, सौ. सोनाली तांबोळी, सौ. ललिता कारंडे, सौ. मृणालिनी अलगुडे, सौ. योगिनी काळे, सौ. स्वाती फणसे, सौ. विद्या घाडगे, सौ. स्वालेहा शेख, सौ. रोहिणी निकम, सौ. सोनाली शिंदे, किरण निकम या शिक्षिकांनी मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या इतर उपक्रमाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा विद्यार्थी उज्वल कामगिरी करत आहेत, याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरण यशस्वी होण्यासाठी जे-जे आवश्यक आहे ते सर्व देण्यास संस्था कटिबद्ध असून सर्व शिक्षक व पालक यांचे योगदान महत्वाचे ठरत आहे. तसेच सर्व यशस्वी विद्याथ्यांचे पुढील वाटचालीसाठी अभिनंदन.

पुढील वाटचालीस सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अर्जुन चोरगे, मधुकर जाधव, नितीन माने, संजय कदम, जगदीश खंडेलवाल, अंबाजी देसाई, उदय गुजर, दिपक मेथा, हरिदास साळुंखे, राजेंद्र खंडेलवाल, संतोष शेंडे, जगदीप शिंदे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक शिक्षक संघ यांनी शुभेच्छा दिल्या.

100 टक्के गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम येणारी कु. संचिता सचिन घोडके सामान्य कुटुबातील होतकरू विद्यार्थिनी असून तिने शाळेतील विविध स्पर्धांमध्ये यापूर्वी प्राविण्य मिळविले आहे. तिचे वडील सचिन विश्वास घोडके भारतीय सेनेमध्ये तेजपूर, आसाममध्ये देशसेवेमध्ये कार्यरत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चुकून पाकिस्तानात गेलेला भारतीय जवान 20 दिवसानंतर भारतात परतला
पुढील बातमी
आमिर खान 'कृष्‍ण', तर १८०० कोटींचा अभिनेता साकारणार 'अर्जुन' !

संबंधित बातम्या