02:39pm | Jan 16, 2025 |
बारामती : बारामतीत कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून त्याच्या उद्घाटन समारंभाला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित आहेत. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमावेळी मंचावर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे हेसुद्धा उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीनंतर काका-पुतण्या एका मंचावर एकत्र दिसून आले. कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोबोटने सत्कारासाठीचं लहान रोपटं आणलं. जेव्हा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याचं मंचावर पुकारण्यात आलं तेव्हा अजित पवार यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं. राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचाही सत्कार सुप्रिया सुळे यांनी केला.
सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, विद्या प्रतिष्ठान आणि केव्हिके एकत्र आंतरराष्ट्रीय लॅब बारामतीत तयार केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय लॅबला निर्मला सीतारामन यांनी निधी देण्याचं आश्वासन दिले आहे. बारामतीतील विद्यार्थी भविष्यात ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकायला जातील.
कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे उपस्थित आहेत. त्यांनी पुन्हा बारामतीला भेट द्यावी अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज दोन मंत्री याठिकाणी आले आहेत. आपण पुन्हा याठिकाणी याल अशी अपेक्षा आहे. आता वर्षभर कुठलेही इलेक्शन नाहीय, त्यामुळे तिळगुळ घेऊया आणि वर्षभर गोड गोड बोलूया असं म्हणत संक्रांतीच्या शुभेच्छाही सुप्रिया सुळे यांनी सर्वांना दिल्या.
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
महिलांच्या विनयभंग प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
सातारा शहर परिसरातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
पन्हाळा परिसरातून आवळल्या कोंडवे गोळीबार प्रकरणातील तीन जणांच्या मुसक्या |
अवैधरित्या अग्नीशस्त्र विक्री प्रकरणी तीन युवकांना अटक |
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सोडत पध्दतीवर अभिप्राय नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन |
रिदमिक व ट्रॅडिशनल योगासन स्पर्धेमध्ये सई ढाणेचे यश |
विठुरायाचे आता थेट दर्शन मिळणार |
सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे युद्ध स्मारक उभारणार : माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई |
गणिताच्या संपादणूकीत सातारा राज्यात अव्वल |
महिलेस धमकी दिल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून सुमारे सव्वा लाखांची फसवणूक |
जरंडेश्वर नाका परिसरात चैन स्नॅचिंग |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या अग्नीशस्त्र विक्री प्रकरणी तीन युवकांना अटक |
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सोडत पध्दतीवर अभिप्राय नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन |
रिदमिक व ट्रॅडिशनल योगासन स्पर्धेमध्ये सई ढाणेचे यश |
विठुरायाचे आता थेट दर्शन मिळणार |
सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे युद्ध स्मारक उभारणार : माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई |
गणिताच्या संपादणूकीत सातारा राज्यात अव्वल |
महिलेस धमकी दिल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून सुमारे सव्वा लाखांची फसवणूक |
जरंडेश्वर नाका परिसरात चैन स्नॅचिंग |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
मंगळवार पेठेत साठ हजारांची घरफोडी |
देऊर येथील दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी |
कोंडवे येथील गोळीबार प्रकरणातील एकास अटक |
बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न करणारे पाचजण ताब्यात |